नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी
दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नांवाने
देखील संबोधले जाते
नरक चतुर्दशी
‘श्रीमद्भागवतपुराणात' अशी एक कथा
आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे नरकासुर
या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य
करत होता. देव आणि मानव यांना तो
फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य
स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकू न
आणलेल्या १६००० स्त्रियांना
कारागृहात कोंडून ठेवले आणि
त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत के ला
प्राचीन हिंदू साहित्यानुसार
श्रीकृ ष्ण, सत्यभामा आणि
काली या तिघांनी आजच्या
दिवशी नरकासुराचा वध
करून त्याच्या बंदिवासातून
16 हजार स्त्रियांची मुक्तता
के ली.
त्या १६००० स्त्रियांनी श्री कृ ष्णाला
सांगितले कि असुरासोबत
राहिल्यामुळे त्यांचे कु टुंबीय देखील
त्यांना स्वीकारणार नाहीत आणि
समाज देखील स्वीकारणार नाही
म्हणून त्या आत्ता आत्महत्या करतील.
श्रीकृ ष्णांनी त्यांचे स्वामी बनून,
आपले नांव देऊन १६००० स्त्रियांना
सन्मान दिला. अशी कथा आहे.
समाजातील अहंकारी, अत्याचारी
वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी
नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते.
सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि
तेल लावून अभ्यंगस्नान के ले जाते.
सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा
तयार करतात. त्यामध्ये तिळाचे तेल
टाकू न दिवा उजळवला जातो. यावेळी
पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फु लांनी
पूजा के ली जाते.
काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे
तयार करून, त्यात फटाके भरून ते
पहाटे जाळण्यात येतात.
कोकणात कारीट नावाचे छोटे कडू
रानफळ मिळते. ते पायाखाली
चिरडून 'गोविंदाचा' तीन वेळा
पुकारा के ला जातो. हे कारीट
नरकासुराचे प्रतीक मानले जाते.