आजची परिस्थिती पाहता आपली आदिवासी चित्रकला साता समुद्रा पार नाव कमावत आहे. पण बारीक लक्ष देता ज्यानी हि परंपरा जगाला दिली त्या आदिवासी कलाकारांची आणि समाजाची अवस्था दयनीय आहे. आदिवासी समाजातील नवीन पिढी ला ह्या चित्र संस्कृतीच्या क्षमतेची कदर नाही आणि आदिवासी कलाकारांना योग्य मोबदला नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कलेचे बाजारीकरण होवून बिगर आदिवासीच फायदा घेत आहेत. जर आज आपण या साठी काही केले नाही तर भविष्यात आपण आपला सांस्कृतिक मालकी हक्क गमावून बसू.
आपल्या कलाकारांना संघटीत करून व्यावसायिक कौशल्य, सामाजिक जबादारीची जाणीव तयार व्हावी या साठी आपण आयुश तर्फे "वारली आर्ट फौउंडेशन" ची स्थापन करीत आहोत.
धेय्य आणि उद्धिष्ट :
१) आदिवासी चित्र संस्कृतीचे जतन व प्रसार (Preserve & promote)
२) आदिवासी चित्र संस्कृती वर संशोधन व लिखाण करणे (Warli Art Development, Product Development, Research & documentation )
३) आदिवासी कलाकारांना आणि आदिवासी समाजाला योग्य तो मोबदला मिळवून देणे (Intellectual Rights, Returns, Social entrepreneurs )
कोण कोण :
१) आदिवासी चित्रकार
२) आदिवासी संस्कृती अभ्यासक, लेखक , शिक्षक
३) आदिवासी महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी
४) आदिवासी बेरोजगार, तरुण, इ
सहभागी व्हा :
- अर्ज आणि शुल्क भरून सहभागी व्हा
Contact Person : Vasant Bhasara (8087546675)