SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
राजकारण
पान. ७
जळगाव
दैिनक¼समूहाचे मराठी वृत्तपत्र
सोमवार, ३ नोव्हेंबर २०१४
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सत्तेची घाई नाही : उद्धव. ४
वर्ष ४ } अंक ५२} महानगर १४ राज्ये } ५८ आवृत्त्या }मुंबई}बेंगळुरू}पुणे }अहमदाबाद (सुरत)}जयपूर }७ राज्ये}१७ केंद्रेमध्य प्रदेश}छत्तीसगड}राजस्थान}नवी दिल्ली}पंजाब}चंदिगड}हरियाणा}हिमाचल प्रदेश}उत्तराखंड}झारखंड}जम्मू-काश्मीर}बिहार }गुजरात}महाराष्ट्र }महाराष्ट्रदैिनकभास्कर
समुह
न्यूज इनबॉक्स
अाज कार्तिकी एकादशी
पंढरपुरात दाेन लाख
वैष्णवांची मांदियाळी
पंढरपूर | कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य
सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे
दोन लाखांहून अधिक वैष्णव भाविक
श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत.
श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे
सात ते आठ तासांपेक्षा अधिक कालावधी
लागत आहे.  सविस्तर. पान ५
गंगा स्वच्छतेच्या बैठकीवर
४३.८५ लाख रुपयांचा खर्च
नवी दिल्ली | गंगा नदी कशाप्रकारे स्वच्छ
करता येईल, यासाठी आयोजित एका
बैठकीवर ४३.८५ लाख रुपये खर्च
झाले आहेत. यामध्ये गंगेच्या स्वच्छता
मोहिमेवरील प्रचारासाठी ५.१ लाख, तर
सुविधा-प्रवासावर २६.७ लाख रुपयांपेक्षा
अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.
आरटीआयमध्ये ही माहिती मिळाली.
विमानात उंदीर घुसला;
उड्डाण पाच तास खोळंबले
लंडन|एकाउंदरामुळेनॉर्वेएअरलाइन्सच्या
विमानालागेल्यामंगळवारीपाचतासउशीर
झाला. विमान न्यूयॉर्ककडे निघण्याच्या
बेतात असताना एका प्रवाशाच्या नजरेला
उंदीर पडला. त्यानंतर पेस्ट कंट्रोल चमूला
पाचारण करण्यात आले. त्याने पाच तास
खटपट करून अखेर उंदीर पकडला.
अंबानी कुटुंबामुळे काशीतील
परंपरा झाली खंडित
वाराणसी | अंबानी कुटुंबामुळे काशी
विश्वनाथ मंदिराची ५९ वर्षे जुनी परंपरा
खंडित झाली आहे. दरवर्षी येथे कार्तिक
महिन्यात श्रीरामचरित मानसचे पाठ होतात.
नीता अंबानींच्या वाढदिवसानिमित्त अंबानी
कुटुंबीय येथे आले होते. यामुळे ब्राह्मणांना
बाहेर रोखून ठेवण्यात आले होते.
भारतात व्हॉट्सअॅपचे सात
कोटींहून अधिक वापरकर्ते
मुंबई | भारतातील व्हॉट्सअॅपच्या सक्रिय
वापरकर्त्यांचा आकडा सात कोटींच्या वर
पोहोचला आहे. हे प्रमाण जगभरातील
व्हॉट्सअॅप युजर्सच्या १०व्या भागाइतके
आहे. सक्रिय वापरकर्ते म्हणजे जे युजर्स
महिनाभरात किमान एका वेळेस तरी
व्हॉट्सअॅपचा वापर करतात.
मास्टर-ब्लास्टरचे प्लेइंग इट माय वे' अात्मचरित्र ६ नोव्हेंबरला प्रकाशित होणार; जागवल्या अाठवणीगौप्यस्फोट
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
‘क्रिकेटचा आधुनिक देव’ असे नामाभिधान
मिळालेला सचिन तेंडुलकर कर्णधारपदी
असताना संघाच्या अपयशामुळे भयभीत व पार
खचून गेला होता. इतकेच नव्हे, तर खेळण्यापेक्षा
आता निवृत्ती घेतलेली बरी, असा विचारही तेव्हा
त्याच्या मनात तरळत होता.
गतवर्षी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या
सचिन तेंडुलकरच्या प्लेइंग इट माय वे' या
आत्मचरित्राचे येत्या ६ नोव्हेंबर रोजी जगभरात
प्रकाशन केले जाणार आहे. त्यात त्याने आपल्या
अडीच दशकांपेक्षा प्रदीर्घ कारकीर्दीतील
अनेक महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा दिला आहे.
कर्णधार म्हणून आलेल्या अपयशावरही सचिन
मनमोकळेपणाने बोलला आहे.
पुस्तकातील एका उताऱ्यात सचिन म्हणतो,
मला पराभवाचा तिटकारा आहे. कर्णधार म्हणून
संघाच्या ढिसाळ कामगिरीसाठी उर्वरित. पान १२
खचलेल्या सचिन तेंडुलकरला घ्यायची होती निवृत्ती
३१मार्च१९९७हाब्लॅकडे
सोमवार, ३१ मार्च १९९७ हा भारतीय
क्रिकेटमधील काळा दिवस व माझ्या
कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट दिवस
होता. आदल्या दिवशी सेंट लॉरेन्स गॅपमधील
एका रेस्तराँमध्ये मी वेटरला गमतीने म्हणालो
होतो की, कोण विंडीजच्या विजयाची भविष्यवाणी
करतोय. सकाळी अॅम्ब्रोस भारताला उद्ध्वस्त
करून टाकेल, असा त्या वेटरला विश्वास होता.
तो१९९७चाविंडीजदौरा
सचिनच्या आयुष्यातील हा सर्वात खडतर
काळ भारताच्या १९९७ मधील वेस्ट इंडीज
दौऱ्याचा आहे. पहिले दोन कसोटी सामने
अनिर्णीतावस्थेत सोडवल्यानंतर तिसऱ्या लढतीत
भारत विजयाकडे वाटचाल करत होता. संघाला
केवळ १२० धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र,
टीम इंडिया अवघ्या ८१ धावांत गारद झाली. मी
स्वत: केवळ चारच धावा करू शकलो होतो.
 नंतरची वनडे मालिकाही आम्ही ४-१
ने गमावली. तिसऱ्या वनडेत शेवटच्या
१० षटकांत ४७ धावा हव्या होत्या.
हातात ६ गडी असूनही हरलो. मोठे शॉट
लावण्यापेक्षा मैदानी फटके खेळा, असे
मी वारंवार बजावत होतो.
मधली फळी व तळाच्या फलंदाजांनी
हवाई फटके खेळले. काही धावबाद
झाले. पराभव होत असल्याचे पाहून मी
चिडलो. नंत खेळाडूंची बैठक बोलावली.
ड्रेसिंग रूममध्ये येताच माझी सटकली.
 मी म्ह्णालो, ही कामगिरी मान्यच
नाही. प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा चांगले
खेळल्यामुळे झालेल्या पराभवाने मी
नाराज नाही. मात्र, परिस्थिती बाजूने
असूनही पराभूत होणे ही गंभीर चूक
असल्याचे दर्शवते, असे मी म्हणालो.
सचिनची जेव्हा सटकते
व्हॉलीबॉल सामना पाहिला;
इराणमध्ये महिलेला कैद
संयुक्तराष्ट्र|इराणमध्येएकाब्रिटिश-इराणी
महिलेला एका वर्षांची कैद ठोठावण्यात
आली आहे. गोनचेह गवामी ही महिला
इराण विरुद्ध इटलीतील पुरुष संघाचा
व्हॉलीबॉल सामना पाहण्याचा प्रयत्न करत
होती. गमावीला २० जून रोजी ताब्यात
घेण्यात आले होते.
प्रतिनिधी । जळगाव
तालुक्यातील नांद्रा बु्द्रूक येथील
सुशीलाबाई सुरेश पाटील (वय ४८)
यांचा डेंग्यूमुळे
मृत्यू झाला.
िजल्ह्यात जूनपासून
अातापर्यंत ६०
जणांना डेंग्यूची
लागण झाली असून
त्यात ७ जणांचा मृत्यू झाला अाहे.
नांद्रा येथील सुशीलाबाई पाटील
(४८) यांना अाठ िदवसांपूर्वी ताप
अाल्यानंतर त्यांनी िनयमित उपचार
घेतले. मात्र, ताप कमी हाेत नसल्याने
त्यांना जळगावात डाॅ. संजय महाजन
यांच्याकडे दाखल केले. त्यानंतर
डेंग्यू असल्याचे िनष्पन्न झाल्यावर
मंगळवारी त्यांना गणपती हाॅस्पिटल येथे
दाखल करण्यात अाले. मात्र, रविवारी
सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपचार
सुरू असताना त्यांचे िनधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी
असा परिवार अाहे. त्यांची अंत्ययात्रा
साेमवारी सकाळी १० वाजता राहत्या
घरापासून िनघणार अाहे.
नांद्रा येथील महिलेचा
डेंग्यूच्या अाजाराने मृत्यू
काेरडा िदवस पाळा
चांगल्या पाण्याचा साठा घरात जास्त िदवस
केल्याने त्यात डेंग्यूचे डास तयार हाेतात.
त्यामुळे घरात अाठवड्यातून कमीत कमी
एकदा तरी काेरडा िदवस पाळावा, असे
अावाहन अाराेग्य िवभागाकडून सातत्याने
करण्यात येत अाहे. मात्र, त्याचे पालन
हाेत नसल्याने डेंग्यूचे प्रमाण वाढले अाहे.
मुंबई | शपथविधीच्या चाळीस तासांनंतर रविवारी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
केले. नगरविकास व गृह ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी
स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. मंत्र्यांना खाती देतानाही भाजपने
धूर्त खेळी केली असल्याचे दिसून आले आहे.
नव्या मं�यांना
खाती देतानाही
राजकीय खेळी
गृह, नगरविकास, पाटबंधारे व वाटप
न झालेली उर्वरित सर्व खाती.
महत्त्व : नगरविकास व गृह ही खाती
महत्त्वाची, पण भ्रष्टाचारासाठी बदनाम.
ती स्वत:कडे ठेवून मुख्यमंत्र्यांनी मोठे
आव्हान स्वीकारल्याचे मानले जात आहे.
देवेंद्र
फडणवीस
मुख्यमंत्री
शालेय िशक्षण, क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण,
वैद्यकीय िशक्षण, सांस्कृतिक व्यवहार
महत्त्व : गृहमंत्री होणार अशी दर्पोक्ती
निवडणुकीपूर्वी तावडे यांनी केली होती. या
पार्श्वभूमीवर कमी अिधकाराचे मंत्रालय
देऊन तावडेंचे पंख छाटले गेले आहेत.
िवनोद
तावडे
कॅबिनेटमंत्री
महसूल, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य,
अल्पसंख्याक, वक्फ, उत्पादन शुल्क.
महत्त्व : मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने
नाराजही होते. दुसऱ्या क्रमांकाचे महसूल
खाते दिले. ग्रामीण जनाधार पाहून कृषी
खातेही. मलईदार उत्पादन शुल्कही.
एकनाथ
खडसे
कॅबिनेटमंत्री
ग्रामीण िवकास आिण जलसंधारण,
महिला आिण बालकल्याण.
महत्त्व : केंद्रात गोपीनाथरावांकडे होते
तेच ग्रामविकास. जलसंधारणमुळे
मराठवाड्यातील दुष्काळावर ठोस काम
करून दाखवण्याची संधी पंकजांना आहे.
पंकजा
मुंडे
कॅबिनेटमंत्री
सहकार, पणन, वस्त्रोद्योग,
सार्वजनिक कार्य.
महत्त्व : सहकार पट्ट्यात भाजपला पाय
रोवण्यासाठी कोल्हापूरच्या पाटलांना हे
खाते. सहकारातील दिग्गजांना पक्षात
ओढण्याची खेळी यामागे आहे.
चंद्रकांत
पाटील
कॅबिनेटमंत्री
आिदवासी िवकास, सामािजक न्याय आिण
िवशेष साहाय्य िवभाग.
महत्त्व : एकमेव आदिवासी मंत्री सावरा
यांना आिदवासी मंत्रालय िमळण्याची
अटकळ आधीच होती. सामाजिक न्याय
खाते सावरा यांच्याकडेच आहे.
िवष्णू
सावरा
कॅबिनेटमंत्री
अर्थ, िनयोजन, वने.
महत्त्व : मुनगंटीवारांना अर्थ नको होते.
नगरविकास खात्याची मागणी होती. आता
त्यांची भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे
ठरेल. मूळ चंद्रपूरचे असल्याने त्यांच्याकडे
आलेली वन खात्याची जबाबदारी सर्वाधिक
वन असलेल्या विदर्भासाठी महत्त्वाची.
सुधीर
मुनगंटीवार
कॅबिनेटमंत्री
उद्योग, खाण, संसदीय कार्य.
महत्त्व : मुनगंटीवारांप्रमाणेच मेहतांनाही
नगरविकास हवे होते. गुजरातकडे जाणारे
उद्योग थांबवण्याची कामगिरी गुजराती
भाषक मेहतांवर टाकण्याची मुख्यमंत्र्यांची
खेळी. उद्योगपतींच्या अडचणी गुजराती
माणूस वेगाने सोडवेल असे गणित आहे.
प्रकाश
मेहता
कॅबिनेटमंत्री
आिदवासी िवकास, सामािजक न्याय
आिण िवशेष साहाय्य िवभाग.
महत्त्व : अनुसूचित जातीचे सरकारमधील
प्रतिनिधित्व. सामाजिक न्याय खातेही.
दिलीप
कांबळे
राज्यमंत्री
ग्रामीण िवकास आिण जलसंधारण,
महिला आिण बालकल्याण.
महत्त्व : ठाकूर यांना राज्यमंत्रिपद देऊन
मुंबईतील उत्तर भारतीयांना िदलासा दिला.
िवद्या
ठाकूर
राज्यमंत्री
खडसेंनामहसूल,पंकजांनाग्रामविकास
शिवसेनेकडून दबावतंत्र;
भाजपचीच खाती हवीत !
विनोद तळेकर | मुंबई
भाजपने खातेवाटप जाहीर केले
असले तरी भाजपकडे असलेली
काही खाती शिवसेनेला हवी आहेत.
आधीच त्यांनी या खात्यांवर दावा
केला होता. त्यामुळे शिवसेना आता
अडून राहिल्यास सत्ता सहभागाच्या
चर्चेत नवा तिढा निर्माण होण्याची
शक्यता आहे. शिवाय शिवसेना सोबत
आल्यास खातेवाटप नव्याने करावे
लागेल. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी
शिवसेनेची सहभागाबाबत चर्चा सुरू
आहे. दोन-तीन दिवसांत भाजपतर्फे
शिवसेनेला योग्य तो पर्याय सादर केला
जाईल. गृह, सार्वजनिक बांधकाम,
पाटबंधारे, ग्रामविकास अशी खाती
िशवसेनेला हवी आहेत.
भाजपकडे महसूल, अर्थ, गृह,
नगरविकास, ग्रामविकास, उद्योग,
कृषी अशी खाती आहेत. यातील
काही खात्यांवर आमचा दावा होता.
ती न मिळाल्यास सत्तेत सहभागी होणे
अशक्य असल्याचे एक शिवसेना नेता
म्हणाला. बोलणी यशस्वी झाल्यास
भाजपला खातेवाटपात बदल करावा
लागेल, असेही हा नेता म्हणाला.
अधिवेशनापूर्वी
हवा विस्तार
विश्वासमत ठरावासाठी १०
नोव्हेंबरपासून विधिमंडळाचे
अधिवेशन अाहे. त्यापूर्वी
शिवसेनेच्या मंत्र्यांसह
मंत्रिमंडळ विस्तार व्हावा,
अशी शिवसेनेची भूमिका आहे.
कारण विश्वासमत जिंकले
की शिवसेनेवर दबाव टाकत
भाजप केंद्राप्रमाणे नाममात्र
वाट्यावर बोळवण करील, असे
शिवसेनेला वाटते.
खडसेंची रुखरुख कायम
पंढरपूर | ओबीसी व बहुजनांना
आपला मुख्यमंत्री व्हावा, अशी
इच्छा होती. कारण ओबीसी व
बहुजनांमुळेच भाजपला बळ
मिळाले आहे, असे सांगत राज्याचे
महसूल-कृषिमंत्री एकनाथ खडसे
यांनी मुख्यमंत्रिपद हुकल्याची
अप्रत्यक्ष खंत व्यक्त केली. तथापि,
खडसे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या
नेमणुकीच्या वेळी जातीपातीचे
राजकारण झाले नाही. मुख्यमंत्रिपद
न मिळाल्याने नाराज नसल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. कार्तिकीनिमित्त
श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा
करण्यासाठी आले असता ते
पत्रकारांशी बोलत होते.
सत्तेत सहभागासंबंधी शिवसेनेशी
चर्चासुरूझालीआहे.त्यांच्याकडून
सकारात्मक निर्णय होईल, अशी
अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
ओबीसी मुख्यमंत्री
व्हावा ही राज्यातील
बहुजनांची इच्छा
पोलिस सूत्रांची माहिती
मुंबई | जवखेडेतील दलित
हत्याकांडानंतर राज्यात अनेक
ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण
लागलेआहे.यातणावाच्यास्थितीचा
फायदा घेत नक्षलवादी राज्यात
दंगली भडकवण्याचा कट रचत
असल्याची पोलिस सूत्रांची माहिती
आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता हाती
घेताच राज्यात नक्षल प्रादुर्भावाला
लगाम घालून कायदा व सुव्यवस्था
रुळावर आणण्याचे मोठे आव्हान
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे
आहे. गृह खाते स्वत:कडे ठेवल्याने
त्यांना या प्रकरणात वैयक्तिकरीत्या
लक्ष घालावे लागेल. खुद्द पोलिस
महासंचालक संजीव दयाल यांनी
अनेक संघटना तणाव निर्माण
करण्याच्या प्रयत्नात असतील, असे
सूचक वक्तव्य केले. अधिक माहिती
देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
जवखेडे हत्याकांड :
दंगली घडवण्याचा
नक्षलवाद्यांचा कट!
विशेष प्रतिनिधी | मुंबई
राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले.
मंत्र्यांना त्यांची खातीही वाटून दिली
गेली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गावी
नागपुरात जाऊन नागरी सत्कारही
घेतला; पण इकडे पदावर येऊन ४८
तास उलटत नाहीत तोच राज्यात
त्यांच्यापुढे अनेक आव्हानांचा डोंगर
उभा ठाकला आहे. यातील काही
पक्षांतर्गतही आहेत. एकंदर नव्या
मुख्यमंत्र्यांची चहुबाजूंनी कोंडी
करण्याचा प्रयत्न होत आहे.
मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
पंढरपुरात रविवारी पुन्हा त्यांनी
आपल्या भावनेला वाट करून दिली.
त्यातच शिवसेनेनेही फडणवीस यांना
कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालवले
आहेत. त्यातच जवखेडेच्या दलित
हत्याकांडाच्या निमित्ताने नक्षलवादी
राज्यात घातपात घडवण्याची भीती
व्यक्त होत आहे. गृह खाते स्वत:कडे
ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपुढे कायदा
सुव्यवस्थेचेही आव्हान आहे.
मुख्यमंत्र्यांचीचहुबाजंूनीकोंडी
{ सत्तारूढ होताच पुढ्यात
आव्हानांचा डोंगर उभा
{ खडसेंच्या नाराजीचे पक्षांतर्गत
आव्हान, शिवसेनेचाही हेका सुरू
{गृह खाते फडणवीसांकडेच,
कायदा-सुव्यवस्थेचेही आव्हान
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
काळा पैसा परत आणण्याची ग्वाही तर
दिली, त्यासाठी कटिबद्ध असल्याचे
सांगितले; परंतु विदेशात नेमका काळा
पैसा किती हे माहीत नसल्याचे सांगून
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या टीकेचे
धनी मात्र ठरले आहेत. लोकसभेच्या
प्रचारात मोदींनी काळा पैसा परत आल्यास
गरिबांच्या खिशात १५-२० लाख रुपये
येतील, असा दावा केला होता.
मोदींनी गेल्या महिन्यापासून
आकाशवाणीवर मन की बात' हे सदर
सुरू केले. दुसऱ्या भागात रविवारी त्यांनी
स्वच्छता, खादी व व्यसनाधीनता या
मुद्द्यांचा ऊहापोह केला. काळ्या पैशाच्या
मुद्द्यावर बोलून मात्र ते वादात अडकले.
मोदी म्हणाले, काळ्या पैशाबाबत
तुमच्या प्रमुख सेवकावर विश्वास ठेवा.
बाहेर किती पैसा आहे हे मला, तुम्हाला,
सरकारला किंवा आधीच्या सरकारलाही
ठाऊकनाही.प्रत्येकजणवेगवेगळेआकडे
सांगत आहे. मला आकड्यात अडकायचे
नाही. रुपया, दोन रुपये...कोटी, अब्ज.
किती का असेनात, देशातील गरिबांचा
हा पैसा आहे. त्यातील पै न पै परत आली
पाहिजे ही माझी कमिटमेंट आहे, असे
मोदी म्हणाले.  संबंधित. पान १०
विदेशात काळा पैसा
किती, ते माहीत नाही
जुन्यावक्तव्यावरघूमजावकेल्यानेमोदीटीकेचेधनी
वनडे|१३वर्षांनीदोन्ही
सलामीवीरांची शतके
कटक | भारताने श्रीलंकेविरुद्ध ५
सामन्यांच्या मालिकेतील पहिली
वनडे १६९ धावांनी जिंकली. ही
भारताची िवश्वचषकाआधीची
तयारी आहे. विश्वचषक १४
फेब्रुवारी २०१५ पासून सुरू होईल.
 सविस्तर. स्पार्ट‌्स
२००१ मध्ये सचिन (१४६), गांगुली (१११)
१९९८ मध्ये सचिन (१२८) व गांगुली (१०९)
आधीचा
विक्रम
अजिंक्य रहाणे
{धावा 111{चेंडू 108
{चौकार13{षटकार2
शिखर धवन
{रन 113{चेंडू 107
{चौकार14{षटकार3
विश्वचषकाचीतयारी
सुरू,भारतानेलंकेला
१६९ धावांनी हरवले
{भारत : 363/5
{श्रीलंका : 194
{ईशांत :
4 विकेट
प्रतिनिधी | औरंगाबाद
यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत कृषिविस्तार
अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका
विकणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, जिल्हा बँकेच्या दूध
संघ शाखेतील लिपिक व परभणी आरटीओतील
लिपिकासह११जणांनारविवारीआर्थिकगुन्हेअन्वेषण
विभागाने अटक केली. त्यांच्याकडून इनोव्हा गाडी,
मोबाइल असा १६ लाख ५७ हजार ५५० रुपयांचा ऐवज
व उत्तरपत्रिकेच्या हस्तलिखित प्रती जप्त करण्यात
आल्या. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. शर्मा
आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
यवतमाळ जिल्हा परिषदेत कृषी िवस्तार
अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या
पदांसाठी दोन नोव्हेंबर
रोजी लेखी परीक्षा
होती. या परीक्षेच्या
उत्तरपत्रिका औरंगाबाद
येथील विक्रीकर
निरीक्षक मकरंद मारुती
खामणकर (४३) व
इतर साथीदार विकत असल्याची माहिती पोलिसांना
मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने छापा
टाकून त्यांना अटक केली. शाखेचे उपनिरीक्षक
विश्वास रोहिदास पाटील यांच्या फिर्यादीवरून
आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला होता. तपास अधिकारी म्हणून शाखेचे निरीक्षक
मधुकर सावंत यांनी काम पाहिले. न्यायालयात सरकार
पक्षातर्फे अॅड. शोभा विजयसेनानी यांनी काम पाहिले.
क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन
मकरंद व त्याचा साथीदार दादासाहेब राघोबा वाडेकर
(५०, किणी, सोयगाव) यांनी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस
सुरू केले होते. मकरंद नोकरीला लागण्यापूर्वीपासून
ते सुरू होते. दरम्यान, वरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका
मिळवून हस्तलिखित स्वरूपात त्याची उत्तरपत्रिका
तयारकरूनिवकतानात्यांनाअटकझाली.आरोपींकडे
सापडलेल्यादस्तऐवजाप्रमाणेत्यांनीपैसेकोडवर्डमध्ये
लिहिले होते. या प्रकरणात राज्यस्तरावरील टोळी
असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्पर्धा परीक्षेच्या
उत्तरपत्रिका विकणारे
११ जण अटकेत
आरोपींमध्ये
दोन लिपिकांसह
विद्यार्थीही;
८ नोव्हेंबरपर्यंत
पोलिस कोठडी
िवशेष प्रतिनिधी | मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी रविवारी
दुचाकीवरून पडल्याने िकरकाेळ दुखापत झाली अाहे.
त्यांच्यावर सध्या मुंबईतील हिंदुजा
रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.
उर्वशी यांची प्रकृती ठीक अाहे.
मात्र यामुळे राज ठाकरे यांनी
पूर्वनियोजित राज्यव्यापी दौरा तीन
ते चार दिवसांनी पुढे ढकलल्याची
माहिती त्यांच्या स्वीय सहायकांनी दिली. या दौऱ्याचे
सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार
असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उर्वशीच्या
अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह रुग्णालयात जाऊन
उर्वशीच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी राज
ठाकरेही उपस्थित हाेते.
राज यांच्या कन्येला
किरकाेळ अपघात
मनसे अध्यक्षांचा दाैरा लांबला
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
स्थलांतरित आणि बेघरांच्या राहण्याच्या अडचणीवर
मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या शहरांत
भाड्याची घरांची योजना सुरू करण्याचा निर्णय
घेतला आहे. नगरविकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ
अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात भाड्याच्या
घरांना चालना देण्याच्या उद्देशाने सरकार महत्त्वपूर्ण
पाउल उचलत आहे. या योजनेत ६ हजार कोटी
रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. उपजीविकेसाठी
मोठ्या शहरांत येणाऱ्या स्थलांतरितांना बहुतांश वेळेस
राहण्यासाठी घराचा प्रश्न भेडसावत असतो. ही योजना
सर्वात आधी राजधनी दिल्लीत सुरू होण्याची शक्यता
आहे. यानंतर हळूहळू ती देशभर सुरू हाेईल.
गरिबांना सरकार
देणार भाड्याने घरे
६००० कोटी रुपयांची योजना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
पत्नी अमृतासह रविवारी विमानाच्या
इकाॅनाॅमी क्लासने मुंबई ते नागपूर
असा प्रवास केला. तिकीटही स्वत:च्या
पैशातून घेतले हाेते.
इकाॅनाॅमी क्लासने प्रवास
जळगाव | राज्याचे महसूलमंत्री एकनाथ
खडसे सोमवारी दोनदिवसीय जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत.
मंत्रिपदी विराजमान
झाल्यानंतर खडसे
प्रथमच जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत.
सोमवारी दुपारी १
वाजता हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर येथे येणार
आहेत. दाेन िदवस खडसे िजल्ह्यात असून
मंगळवारी मुंबईला जाणार अाहेत.
मंत्री झाल्यानंतर एकनाथ
खडसे प्रथमच जिल्ह्यात

More Related Content

What's hot (8)

Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Ya geetarthachi thori avinash nagarkar
Ya geetarthachi thori avinash nagarkarYa geetarthachi thori avinash nagarkar
Ya geetarthachi thori avinash nagarkar
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 

Viewers also liked

천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마
천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마
천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마tjdehdfls
 
천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ
천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ
천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅtjdehdfls
 
Analisis STP dan Marketing Mix TransVision
Analisis STP dan Marketing Mix TransVisionAnalisis STP dan Marketing Mix TransVision
Analisis STP dan Marketing Mix TransVisionAyu Noor Asry
 
Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9
Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9
Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9Daemon Quest Deloitte
 
Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.
Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.
Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.Núcleo de Tecnologia educacional
 
Bbr 503 & buying
Bbr 503 & buyingBbr 503 & buying
Bbr 503 & buyingsmumbahelp
 

Viewers also liked (9)

천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마
천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마
천안건마『OPGANDA.COM』잠실건마月『오피뷰』부산건마
 
천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ
천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ
천안건마『劍神』잠실건마月OPGANDA.COM【오피뷰】부산건마ゅ
 
Analisis STP dan Marketing Mix TransVision
Analisis STP dan Marketing Mix TransVisionAnalisis STP dan Marketing Mix TransVision
Analisis STP dan Marketing Mix TransVision
 
Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9
Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9
Javier Gándara | Caso EasyJet | #MSF9
 
рівняння, 7кл
рівняння, 7клрівняння, 7кл
рівняння, 7кл
 
Origin fertility care
Origin fertility careOrigin fertility care
Origin fertility care
 
Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.
Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.
Evolução da Comunicação Humana e dos Meios de Comunicação.
 
Bbr 503 & buying
Bbr 503 & buyingBbr 503 & buying
Bbr 503 & buying
 
Proyectode fisica
Proyectode fisicaProyectode fisica
Proyectode fisica
 

More from divyamarathibhaskarnews (17)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Latest jalgaon News In Marathi

  • 1. राजकारण पान. ७ जळगाव दैिनक¼समूहाचे मराठी वृत्तपत्र सोमवार, ३ नोव्हेंबर २०१४ एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सत्तेची घाई नाही : उद्धव. ४ वर्ष ४ } अंक ५२} महानगर १४ राज्ये } ५८ आवृत्त्या }मुंबई}बेंगळुरू}पुणे }अहमदाबाद (सुरत)}जयपूर }७ राज्ये}१७ केंद्रेमध्य प्रदेश}छत्तीसगड}राजस्थान}नवी दिल्ली}पंजाब}चंदिगड}हरियाणा}हिमाचल प्रदेश}उत्तराखंड}झारखंड}जम्मू-काश्मीर}बिहार }गुजरात}महाराष्ट्र }महाराष्ट्रदैिनकभास्कर समुह न्यूज इनबॉक्स अाज कार्तिकी एकादशी पंढरपुरात दाेन लाख वैष्णवांची मांदियाळी पंढरपूर | कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे दोन लाखांहून अधिक वैष्णव भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे सात ते आठ तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. सविस्तर. पान ५ गंगा स्वच्छतेच्या बैठकीवर ४३.८५ लाख रुपयांचा खर्च नवी दिल्ली | गंगा नदी कशाप्रकारे स्वच्छ करता येईल, यासाठी आयोजित एका बैठकीवर ४३.८५ लाख रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये गंगेच्या स्वच्छता मोहिमेवरील प्रचारासाठी ५.१ लाख, तर सुविधा-प्रवासावर २६.७ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. आरटीआयमध्ये ही माहिती मिळाली. विमानात उंदीर घुसला; उड्डाण पाच तास खोळंबले लंडन|एकाउंदरामुळेनॉर्वेएअरलाइन्सच्या विमानालागेल्यामंगळवारीपाचतासउशीर झाला. विमान न्यूयॉर्ककडे निघण्याच्या बेतात असताना एका प्रवाशाच्या नजरेला उंदीर पडला. त्यानंतर पेस्ट कंट्रोल चमूला पाचारण करण्यात आले. त्याने पाच तास खटपट करून अखेर उंदीर पकडला. अंबानी कुटुंबामुळे काशीतील परंपरा झाली खंडित वाराणसी | अंबानी कुटुंबामुळे काशी विश्वनाथ मंदिराची ५९ वर्षे जुनी परंपरा खंडित झाली आहे. दरवर्षी येथे कार्तिक महिन्यात श्रीरामचरित मानसचे पाठ होतात. नीता अंबानींच्या वाढदिवसानिमित्त अंबानी कुटुंबीय येथे आले होते. यामुळे ब्राह्मणांना बाहेर रोखून ठेवण्यात आले होते. भारतात व्हॉट्सअॅपचे सात कोटींहून अधिक वापरकर्ते मुंबई | भारतातील व्हॉट्सअॅपच्या सक्रिय वापरकर्त्यांचा आकडा सात कोटींच्या वर पोहोचला आहे. हे प्रमाण जगभरातील व्हॉट्सअॅप युजर्सच्या १०व्या भागाइतके आहे. सक्रिय वापरकर्ते म्हणजे जे युजर्स महिनाभरात किमान एका वेळेस तरी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मास्टर-ब्लास्टरचे प्लेइंग इट माय वे' अात्मचरित्र ६ नोव्हेंबरला प्रकाशित होणार; जागवल्या अाठवणीगौप्यस्फोट वृत्तसंस्था | नवी दिल्ली ‘क्रिकेटचा आधुनिक देव’ असे नामाभिधान मिळालेला सचिन तेंडुलकर कर्णधारपदी असताना संघाच्या अपयशामुळे भयभीत व पार खचून गेला होता. इतकेच नव्हे, तर खेळण्यापेक्षा आता निवृत्ती घेतलेली बरी, असा विचारही तेव्हा त्याच्या मनात तरळत होता. गतवर्षी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्राचे येत्या ६ नोव्हेंबर रोजी जगभरात प्रकाशन केले जाणार आहे. त्यात त्याने आपल्या अडीच दशकांपेक्षा प्रदीर्घ कारकीर्दीतील अनेक महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा दिला आहे. कर्णधार म्हणून आलेल्या अपयशावरही सचिन मनमोकळेपणाने बोलला आहे. पुस्तकातील एका उताऱ्यात सचिन म्हणतो, मला पराभवाचा तिटकारा आहे. कर्णधार म्हणून संघाच्या ढिसाळ कामगिरीसाठी उर्वरित. पान १२ खचलेल्या सचिन तेंडुलकरला घ्यायची होती निवृत्ती ३१मार्च१९९७हाब्लॅकडे सोमवार, ३१ मार्च १९९७ हा भारतीय क्रिकेटमधील काळा दिवस व माझ्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट दिवस होता. आदल्या दिवशी सेंट लॉरेन्स गॅपमधील एका रेस्तराँमध्ये मी वेटरला गमतीने म्हणालो होतो की, कोण विंडीजच्या विजयाची भविष्यवाणी करतोय. सकाळी अॅम्ब्रोस भारताला उद्ध्वस्त करून टाकेल, असा त्या वेटरला विश्वास होता. तो१९९७चाविंडीजदौरा सचिनच्या आयुष्यातील हा सर्वात खडतर काळ भारताच्या १९९७ मधील वेस्ट इंडीज दौऱ्याचा आहे. पहिले दोन कसोटी सामने अनिर्णीतावस्थेत सोडवल्यानंतर तिसऱ्या लढतीत भारत विजयाकडे वाटचाल करत होता. संघाला केवळ १२० धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, टीम इंडिया अवघ्या ८१ धावांत गारद झाली. मी स्वत: केवळ चारच धावा करू शकलो होतो. नंतरची वनडे मालिकाही आम्ही ४-१ ने गमावली. तिसऱ्या वनडेत शेवटच्या १० षटकांत ४७ धावा हव्या होत्या. हातात ६ गडी असूनही हरलो. मोठे शॉट लावण्यापेक्षा मैदानी फटके खेळा, असे मी वारंवार बजावत होतो. मधली फळी व तळाच्या फलंदाजांनी हवाई फटके खेळले. काही धावबाद झाले. पराभव होत असल्याचे पाहून मी चिडलो. नंत खेळाडूंची बैठक बोलावली. ड्रेसिंग रूममध्ये येताच माझी सटकली. मी म्ह्णालो, ही कामगिरी मान्यच नाही. प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा चांगले खेळल्यामुळे झालेल्या पराभवाने मी नाराज नाही. मात्र, परिस्थिती बाजूने असूनही पराभूत होणे ही गंभीर चूक असल्याचे दर्शवते, असे मी म्हणालो. सचिनची जेव्हा सटकते व्हॉलीबॉल सामना पाहिला; इराणमध्ये महिलेला कैद संयुक्तराष्ट्र|इराणमध्येएकाब्रिटिश-इराणी महिलेला एका वर्षांची कैद ठोठावण्यात आली आहे. गोनचेह गवामी ही महिला इराण विरुद्ध इटलीतील पुरुष संघाचा व्हॉलीबॉल सामना पाहण्याचा प्रयत्न करत होती. गमावीला २० जून रोजी ताब्यात घेण्यात आले होते. प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा बु्द्रूक येथील सुशीलाबाई सुरेश पाटील (वय ४८) यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. िजल्ह्यात जूनपासून अातापर्यंत ६० जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यात ७ जणांचा मृत्यू झाला अाहे. नांद्रा येथील सुशीलाबाई पाटील (४८) यांना अाठ िदवसांपूर्वी ताप अाल्यानंतर त्यांनी िनयमित उपचार घेतले. मात्र, ताप कमी हाेत नसल्याने त्यांना जळगावात डाॅ. संजय महाजन यांच्याकडे दाखल केले. त्यानंतर डेंग्यू असल्याचे िनष्पन्न झाल्यावर मंगळवारी त्यांना गणपती हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात अाले. मात्र, रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे िनधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार अाहे. त्यांची अंत्ययात्रा साेमवारी सकाळी १० वाजता राहत्या घरापासून िनघणार अाहे. नांद्रा येथील महिलेचा डेंग्यूच्या अाजाराने मृत्यू काेरडा िदवस पाळा चांगल्या पाण्याचा साठा घरात जास्त िदवस केल्याने त्यात डेंग्यूचे डास तयार हाेतात. त्यामुळे घरात अाठवड्यातून कमीत कमी एकदा तरी काेरडा िदवस पाळावा, असे अावाहन अाराेग्य िवभागाकडून सातत्याने करण्यात येत अाहे. मात्र, त्याचे पालन हाेत नसल्याने डेंग्यूचे प्रमाण वाढले अाहे. मुंबई | शपथविधीच्या चाळीस तासांनंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. नगरविकास व गृह ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. मंत्र्यांना खाती देतानाही भाजपने धूर्त खेळी केली असल्याचे दिसून आले आहे. नव्या मं�यांना खाती देतानाही राजकीय खेळी गृह, नगरविकास, पाटबंधारे व वाटप न झालेली उर्वरित सर्व खाती. महत्त्व : नगरविकास व गृह ही खाती महत्त्वाची, पण भ्रष्टाचारासाठी बदनाम. ती स्वत:कडे ठेवून मुख्यमंत्र्यांनी मोठे आव्हान स्वीकारल्याचे मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शालेय िशक्षण, क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय िशक्षण, सांस्कृतिक व्यवहार महत्त्व : गृहमंत्री होणार अशी दर्पोक्ती निवडणुकीपूर्वी तावडे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर कमी अिधकाराचे मंत्रालय देऊन तावडेंचे पंख छाटले गेले आहेत. िवनोद तावडे कॅबिनेटमंत्री महसूल, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य, अल्पसंख्याक, वक्फ, उत्पादन शुल्क. महत्त्व : मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने नाराजही होते. दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खाते दिले. ग्रामीण जनाधार पाहून कृषी खातेही. मलईदार उत्पादन शुल्कही. एकनाथ खडसे कॅबिनेटमंत्री ग्रामीण िवकास आिण जलसंधारण, महिला आिण बालकल्याण. महत्त्व : केंद्रात गोपीनाथरावांकडे होते तेच ग्रामविकास. जलसंधारणमुळे मराठवाड्यातील दुष्काळावर ठोस काम करून दाखवण्याची संधी पंकजांना आहे. पंकजा मुंडे कॅबिनेटमंत्री सहकार, पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक कार्य. महत्त्व : सहकार पट्ट्यात भाजपला पाय रोवण्यासाठी कोल्हापूरच्या पाटलांना हे खाते. सहकारातील दिग्गजांना पक्षात ओढण्याची खेळी यामागे आहे. चंद्रकांत पाटील कॅबिनेटमंत्री आिदवासी िवकास, सामािजक न्याय आिण िवशेष साहाय्य िवभाग. महत्त्व : एकमेव आदिवासी मंत्री सावरा यांना आिदवासी मंत्रालय िमळण्याची अटकळ आधीच होती. सामाजिक न्याय खाते सावरा यांच्याकडेच आहे. िवष्णू सावरा कॅबिनेटमंत्री अर्थ, िनयोजन, वने. महत्त्व : मुनगंटीवारांना अर्थ नको होते. नगरविकास खात्याची मागणी होती. आता त्यांची भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मूळ चंद्रपूरचे असल्याने त्यांच्याकडे आलेली वन खात्याची जबाबदारी सर्वाधिक वन असलेल्या विदर्भासाठी महत्त्वाची. सुधीर मुनगंटीवार कॅबिनेटमंत्री उद्योग, खाण, संसदीय कार्य. महत्त्व : मुनगंटीवारांप्रमाणेच मेहतांनाही नगरविकास हवे होते. गुजरातकडे जाणारे उद्योग थांबवण्याची कामगिरी गुजराती भाषक मेहतांवर टाकण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी. उद्योगपतींच्या अडचणी गुजराती माणूस वेगाने सोडवेल असे गणित आहे. प्रकाश मेहता कॅबिनेटमंत्री आिदवासी िवकास, सामािजक न्याय आिण िवशेष साहाय्य िवभाग. महत्त्व : अनुसूचित जातीचे सरकारमधील प्रतिनिधित्व. सामाजिक न्याय खातेही. दिलीप कांबळे राज्यमंत्री ग्रामीण िवकास आिण जलसंधारण, महिला आिण बालकल्याण. महत्त्व : ठाकूर यांना राज्यमंत्रिपद देऊन मुंबईतील उत्तर भारतीयांना िदलासा दिला. िवद्या ठाकूर राज्यमंत्री खडसेंनामहसूल,पंकजांनाग्रामविकास शिवसेनेकडून दबावतंत्र; भाजपचीच खाती हवीत ! विनोद तळेकर | मुंबई भाजपने खातेवाटप जाहीर केले असले तरी भाजपकडे असलेली काही खाती शिवसेनेला हवी आहेत. आधीच त्यांनी या खात्यांवर दावा केला होता. त्यामुळे शिवसेना आता अडून राहिल्यास सत्ता सहभागाच्या चर्चेत नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेना सोबत आल्यास खातेवाटप नव्याने करावे लागेल. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी शिवसेनेची सहभागाबाबत चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत भाजपतर्फे शिवसेनेला योग्य तो पर्याय सादर केला जाईल. गृह, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, ग्रामविकास अशी खाती िशवसेनेला हवी आहेत. भाजपकडे महसूल, अर्थ, गृह, नगरविकास, ग्रामविकास, उद्योग, कृषी अशी खाती आहेत. यातील काही खात्यांवर आमचा दावा होता. ती न मिळाल्यास सत्तेत सहभागी होणे अशक्य असल्याचे एक शिवसेना नेता म्हणाला. बोलणी यशस्वी झाल्यास भाजपला खातेवाटपात बदल करावा लागेल, असेही हा नेता म्हणाला. अधिवेशनापूर्वी हवा विस्तार विश्वासमत ठरावासाठी १० नोव्हेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन अाहे. त्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. कारण विश्वासमत जिंकले की शिवसेनेवर दबाव टाकत भाजप केंद्राप्रमाणे नाममात्र वाट्यावर बोळवण करील, असे शिवसेनेला वाटते. खडसेंची रुखरुख कायम पंढरपूर | ओबीसी व बहुजनांना आपला मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा होती. कारण ओबीसी व बहुजनांमुळेच भाजपला बळ मिळाले आहे, असे सांगत राज्याचे महसूल-कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रिपद हुकल्याची अप्रत्यक्ष खंत व्यक्त केली. तथापि, खडसे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या नेमणुकीच्या वेळी जातीपातीचे राजकारण झाले नाही. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्तिकीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत सहभागासंबंधी शिवसेनेशी चर्चासुरूझालीआहे.त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. ओबीसी मुख्यमंत्री व्हावा ही राज्यातील बहुजनांची इच्छा पोलिस सूत्रांची माहिती मुंबई | जवखेडेतील दलित हत्याकांडानंतर राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागलेआहे.यातणावाच्यास्थितीचा फायदा घेत नक्षलवादी राज्यात दंगली भडकवण्याचा कट रचत असल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता हाती घेताच राज्यात नक्षल प्रादुर्भावाला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे आहे. गृह खाते स्वत:कडे ठेवल्याने त्यांना या प्रकरणात वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे लागेल. खुद्द पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी अनेक संघटना तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतील, असे सूचक वक्तव्य केले. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. जवखेडे हत्याकांड : दंगली घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट! विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले. मंत्र्यांना त्यांची खातीही वाटून दिली गेली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गावी नागपुरात जाऊन नागरी सत्कारही घेतला; पण इकडे पदावर येऊन ४८ तास उलटत नाहीत तोच राज्यात त्यांच्यापुढे अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकला आहे. यातील काही पक्षांतर्गतही आहेत. एकंदर नव्या मुख्यमंत्र्यांची चहुबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. पंढरपुरात रविवारी पुन्हा त्यांनी आपल्या भावनेला वाट करून दिली. त्यातच शिवसेनेनेही फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यातच जवखेडेच्या दलित हत्याकांडाच्या निमित्ताने नक्षलवादी राज्यात घातपात घडवण्याची भीती व्यक्त होत आहे. गृह खाते स्वत:कडे ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपुढे कायदा सुव्यवस्थेचेही आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांचीचहुबाजंूनीकोंडी { सत्तारूढ होताच पुढ्यात आव्हानांचा डोंगर उभा { खडसेंच्या नाराजीचे पक्षांतर्गत आव्हान, शिवसेनेचाही हेका सुरू {गृह खाते फडणवीसांकडेच, कायदा-सुव्यवस्थेचेही आव्हान वृत्तसंस्था | नवी दिल्ली काळा पैसा परत आणण्याची ग्वाही तर दिली, त्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले; परंतु विदेशात नेमका काळा पैसा किती हे माहीत नसल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या टीकेचे धनी मात्र ठरले आहेत. लोकसभेच्या प्रचारात मोदींनी काळा पैसा परत आल्यास गरिबांच्या खिशात १५-२० लाख रुपये येतील, असा दावा केला होता. मोदींनी गेल्या महिन्यापासून आकाशवाणीवर मन की बात' हे सदर सुरू केले. दुसऱ्या भागात रविवारी त्यांनी स्वच्छता, खादी व व्यसनाधीनता या मुद्द्यांचा ऊहापोह केला. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर बोलून मात्र ते वादात अडकले. मोदी म्हणाले, काळ्या पैशाबाबत तुमच्या प्रमुख सेवकावर विश्वास ठेवा. बाहेर किती पैसा आहे हे मला, तुम्हाला, सरकारला किंवा आधीच्या सरकारलाही ठाऊकनाही.प्रत्येकजणवेगवेगळेआकडे सांगत आहे. मला आकड्यात अडकायचे नाही. रुपया, दोन रुपये...कोटी, अब्ज. किती का असेनात, देशातील गरिबांचा हा पैसा आहे. त्यातील पै न पै परत आली पाहिजे ही माझी कमिटमेंट आहे, असे मोदी म्हणाले. संबंधित. पान १० विदेशात काळा पैसा किती, ते माहीत नाही जुन्यावक्तव्यावरघूमजावकेल्यानेमोदीटीकेचेधनी वनडे|१३वर्षांनीदोन्ही सलामीवीरांची शतके कटक | भारताने श्रीलंकेविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिली वनडे १६९ धावांनी जिंकली. ही भारताची िवश्वचषकाआधीची तयारी आहे. विश्वचषक १४ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू होईल. सविस्तर. स्पार्ट‌्स २००१ मध्ये सचिन (१४६), गांगुली (१११) १९९८ मध्ये सचिन (१२८) व गांगुली (१०९) आधीचा विक्रम अजिंक्य रहाणे {धावा 111{चेंडू 108 {चौकार13{षटकार2 शिखर धवन {रन 113{चेंडू 107 {चौकार14{षटकार3 विश्वचषकाचीतयारी सुरू,भारतानेलंकेला १६९ धावांनी हरवले {भारत : 363/5 {श्रीलंका : 194 {ईशांत : 4 विकेट प्रतिनिधी | औरंगाबाद यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत कृषिविस्तार अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका विकणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, जिल्हा बँकेच्या दूध संघ शाखेतील लिपिक व परभणी आरटीओतील लिपिकासह११जणांनारविवारीआर्थिकगुन्हेअन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून इनोव्हा गाडी, मोबाइल असा १६ लाख ५७ हजार ५५० रुपयांचा ऐवज व उत्तरपत्रिकेच्या हस्तलिखित प्रती जप्त करण्यात आल्या. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. शर्मा आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यवतमाळ जिल्हा परिषदेत कृषी िवस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी दोन नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका औरंगाबाद येथील विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर (४३) व इतर साथीदार विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकून त्यांना अटक केली. शाखेचे उपनिरीक्षक विश्वास रोहिदास पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी म्हणून शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी काम पाहिले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अॅड. शोभा विजयसेनानी यांनी काम पाहिले. क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन मकरंद व त्याचा साथीदार दादासाहेब राघोबा वाडेकर (५०, किणी, सोयगाव) यांनी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू केले होते. मकरंद नोकरीला लागण्यापूर्वीपासून ते सुरू होते. दरम्यान, वरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळवून हस्तलिखित स्वरूपात त्याची उत्तरपत्रिका तयारकरूनिवकतानात्यांनाअटकझाली.आरोपींकडे सापडलेल्यादस्तऐवजाप्रमाणेत्यांनीपैसेकोडवर्डमध्ये लिहिले होते. या प्रकरणात राज्यस्तरावरील टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेच्या उत्तरपत्रिका विकणारे ११ जण अटकेत आरोपींमध्ये दोन लिपिकांसह विद्यार्थीही; ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी िवशेष प्रतिनिधी | मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी रविवारी दुचाकीवरून पडल्याने िकरकाेळ दुखापत झाली अाहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. उर्वशी यांची प्रकृती ठीक अाहे. मात्र यामुळे राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित राज्यव्यापी दौरा तीन ते चार दिवसांनी पुढे ढकलल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांनी दिली. या दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उर्वशीच्या अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह रुग्णालयात जाऊन उर्वशीच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी राज ठाकरेही उपस्थित हाेते. राज यांच्या कन्येला किरकाेळ अपघात मनसे अध्यक्षांचा दाैरा लांबला वृत्तसंस्था | नवी दिल्ली स्थलांतरित आणि बेघरांच्या राहण्याच्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या शहरांत भाड्याची घरांची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरांना चालना देण्याच्या उद्देशाने सरकार महत्त्वपूर्ण पाउल उचलत आहे. या योजनेत ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. उपजीविकेसाठी मोठ्या शहरांत येणाऱ्या स्थलांतरितांना बहुतांश वेळेस राहण्यासाठी घराचा प्रश्न भेडसावत असतो. ही योजना सर्वात आधी राजधनी दिल्लीत सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू ती देशभर सुरू हाेईल. गरिबांना सरकार देणार भाड्याने घरे ६००० कोटी रुपयांची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृतासह रविवारी विमानाच्या इकाॅनाॅमी क्लासने मुंबई ते नागपूर असा प्रवास केला. तिकीटही स्वत:च्या पैशातून घेतले हाेते. इकाॅनाॅमी क्लासने प्रवास जळगाव | राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे सोमवारी दोनदिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर खडसे प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी दुपारी १ वाजता हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर येथे येणार आहेत. दाेन िदवस खडसे िजल्ह्यात असून मंगळवारी मुंबईला जाणार अाहेत. मंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच जिल्ह्यात